प्रहार ने मिळवून दिला 41 कामगारांना न्याय सर्व कामगारांना पूर्ववत कामावर

प्रहार ने मिळवून दिला 41 कामगारांना न्याय सर्व कामगारांना पूर्ववत कामावर

विदर्भाचा वीर न्यूज चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – चार वर्षापूर्वी एस आर बी एच येथून सी आर सी सी या ठेकेदार तत्त्वावर कंपनीत कामगारांना कामावर घेण्यात आले  सुरळीत काम सुरू असताना अचानक 41 कामगारांना अमीर अटोंबाईलस्  या ठेकेदार तत्वावर असणाऱ्या कंपनीत कामावर जांच्याचे तोंडी आदेश crcc ने दिले मात्र कामगारांना ठोस काही नसल्याने व जवळपास एक महिना खाली असल्याने सर्व कामगारांनी प्रहारच्या जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर यांच्या कडे धाव घेतली व आपली आपबिती सांगितली.

आमची अंतिम रक्कम मिळवून द्या . आम्ही सर्व कामगार (ड्रायव्हर, पीसी ऑपरेटर, पेलोडर ऑपरेटर) चार वर्षे आणि आठ महिन्यांपासून सीआरसीसी कडे कामावर  आहोत.  आम्हाला 3/06/2024 पासून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आमचे  काम बंद पडले आहे असे सीआरसीसी सांगत आहे. कामावरून काढलेल्या कामगाराला कोणतेही पेमेंट सीआरसीसी ने कामगारांना दिले नाही . आमचे पेमेंट खालीलप्रमाणे आहे. चार वर्षे आणि सहा महिन्यांच्या रोजीचे  पैसे, पंधरा महिन्यांचे एरिया, 18 महिन्यांचा बोनस, दोन महिन्यांचे पेमेंट, हे सर्व आम्हाला S.R.C.C.कडून मिळाले पाहिजे. व याबाबत कंपनीने आम्हाला कोणतीही लेखी माहिती दिलेली नाही. आम्हाला C R C C मधून काढण्यासाठी कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. तसेच अन्य कंत्राटदाराकडे जाण्यासाठी कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. कंपनी आमच्यावर दबाव आणत आहे. तुम्ही दुसऱ्या कंत्राटदाराचे काम करा.

आता तुम्हीच आम्हाला न्याय द्या. आमचे S.R.C.C. कडून  आमच्याकडून पेमेंटची रक्कम मिळवून द्या , कारण ही C.R.C.C कंपनी तुम्हाला काही मिळणार नाही, असे सांगून टाळत आहे,  या कंपनीने आम्हाला या नोटिसा दिल्या नाहीत. आणि आमचे गेट पास जबरदस्तीने हिसकावून घेतले आहेत. कोणत्याही हमीशिवाय अमीर ऑटोमोबाईल कंपनीत ड्युटीसाठी पाठवले. आमची तुमच्याकडे एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्यावा, कायदेशीर नोटीस बजावून आम्हाला दुसऱ्या कंपनीत काम द्यावे. आणि C.R.C.C. कडून 4 वर्षे 6 महिन्यांचे थेट पेमेंट, 15 महिन्यांचे एरिया, 18 महिन्यांचे बोनस आणि 2 महिन्यांचे पेमेंट दिले जावे. अशा निवेदन प्रहार लां देण्यात आले बिडकर यांनी कोणताही विलंब ना करता CRCC ला जब विचारला असता उडवा उडवी ची उत्तरे मिळाली लगेच दुसऱ्या दिवशी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी ( माणिकगड सिमेंट कंपनी ) च्या मॅनेजमेंट सोबत व कंत्राटदारासोबत बैठक लावून सर्व कामगारांना पूर्ववत कंबर घेण्यास तयार झाले व सर्व मागण्या मान्य केल्या  या बैठकीत प्रहार तालुका अध्यक्ष बंटी शिंदे, प्रहार कामगार तालुका अध्यक्ष महादेव बेरड, प्रहार वाहतूक तालुका अध्यक्ष सिध्देश्वर केंद्रे व सर्व कामगार उपस्थित होते त्याबद्दल सर्व कामगारांनी प्रहार चे आभार मानले

COMMENTS