मेघालय राज्याचे महामहीम राज्यपाल यांचा विदर्भ अमरावती धनगर वाड्यांचा दौरा

मेघालय राज्याचे महामहीम राज्यपाल यांचा विदर्भ अमरावती धनगर वाड्यांचा दौरा

विदर्भाचा वीर न्यूज चौफेर (विशेष प्रतिनिधी  अमरावती) – दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ला मेघालय राज्याचे  राज्यपाल महामहीम चंद्रशेखर एच. विजयशंकर हे विदर्भातील अमरावती येथे धनगर वाड्यांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे प्रथम स्वागत नागपूर विमानतळावर करण्यात आले.त्यासाठी पद्मश्री डॉ विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, डॉ सुनीता महात्मे, महादेवराव पातोंड सचीव, वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर, डॉ विनोद बरडे, शरद ऊरकुडे, सागर थोटे, सागर पाल, बेलभक्ते ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व राज्यपालांचे जंग्गी नागपूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. नंतर अमरावती कलेक्टर आफीसला ढोल ताशे व बंदूकाच्या सलामीत जंग्गी स्वागत करण्यात आले.आणी धनगर वाड्यावर २५ , ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात धनगर वस्तीत जंग्गी स्वागत करण्यात आले. धनगरी न्रुत्य सादर करण्यात आले. महामहीम राज्यपाल यांनी अगदी साध्या भोजनाचा आस्वाद घेतला. सर्व समस्या जाणुन घेतल्या आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही कार्यकर्त्यांना मंत्रालयात बैठकीसाठी बोलाविले व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. खुप मनमीळाऊ व्यक्तीमत्व, आदर्श व्यक्तिमत्व, निर्भय व्यक्तीमत्व असल्याचेही जाणवलं. आणी मला त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेता आला. ततपुर्वी आमचें आदर्श महादेवराव पातोंड साहेब सचीव मला सकाळी ९ म्हणाले की तुमच्या कळे भविष्यात ते जेवण करायला येवू शकतात. पण मी म्हटलं की माझ कुठे एवढं नशीब पण त्याच दिवशी २ वाजता माझ्याघरी तर नाही पण त्यांच्यासोबत जेवणाचा योग आला. धन्य ते ऊद्दगार धन्य ती व्यक्ती, धन्य ते व्यक्तीमत्व आणि धन्य मी पावले. असा अद्तभुत अनुभव आला. आणी त्यांच्या दौऱ्यात मला जाण्याचा योग आला. मेघालय राज्याच्या राज्यपालांच्या ताफ्यात व दौऱ्यात जाण्याचा योग आला. आणी खुप छान अनुभव राहीला. विदर्भात संतोष महात्मे व धनगर बंधू भगिनींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

COMMENTS