आसिफ खान यांच्या उपोषण मंडपाला आघाडीच्या नेत्यांची भेट

आसिफ खान यांच्या उपोषण मंडपाला आघाडीच्या नेत्यांची भेट

विदर्भाचा वीर न्यूज चौफेर (अर्पित वाहने वर्धा) – मुस्लिम धर्माचे धर्म गुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या. या कारणाने राम गिरी महाराज यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यात किमान 38  पोलिस तक्रारी दाखल झाल्या. या आधारे रामगिरी महाराज गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा त्यांना अटक न केल्यामुळे यांच्या अटकेच्या मागणी करीता ए.आय.एम.आय.एम. चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दिनांक २१/ ०८ /२०२४ रोजी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मालारर्पण व अभिवादन करुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
महायुतीचे शिंदे – फडणवीस सरकार जाणीव पुर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांची पाठ राखण करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
उपोषण मंडपाला आप चे व महविकास आघाडीचे नेते मंडळी सह विविध सामाजिक कार्कर्त्यांनी भेट देऊन आसिफ खान यांच्या उपोषणाला समर्थन जाहीर केले.
देशात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे, महाराष्ट्रतील हिंदु-मुस्लिम एक्य धोक्यात आणणारे रामगिरी महाराज सारखे व्यक्ती जाणीव पुर्वक असे वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करत आहे. असे असताना सुधा रामगिरी महाराज यांना पोलीस प्रशासना कडून जर अटक होत नाही याचा अर्थ असा की राज्य सरकार ह्या रामगिरी महाराज यांना पाठीशी घालत आहे.
संविधानिक मार्गाचा अवलंब करून जो पर्यंत रामगिरी महाराज यांना अटक होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेऊ.
असा इशारा आसिफ खान यांनी  प्रशासनाला दिला.

COMMENTS