आता बुरुडी व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर बूरुड कारागिरांना राहावे लागत आहे हिरव्या बांबू पासून वंचित

आता बुरुडी व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर बूरुड कारागिरांना राहावे लागत आहे हिरव्या बांबू पासून वंचित

संतोष पटकोटवार यांचा आरोप

विदर्भाचा वीर न्यूज चौफेर (गौतम धोटे) – चंद्रपूर जिल्ह्यात कानाकोपऱ्यात हिरव्या बांबू पासून निरनिराळ्या वस्तू तयार करणारे बूरुड कामगार वास्तव्य करतात, त्यांना ऊतमरितीने जीवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासना कडून प्रती कुटुंब धारकाला वार्षिक एक हजार पाचशे नग हिरवा बांबू सवलती दराने पुरवठा करण्याचा शासन निर्णय आहे, गेल्या अनेक वर्षापासून बूरुड कारागिरांना वनविभागाकडुन सवलती दरात हिरवा बांबू नियमित पणे पूरवठा केल्या जात होता मात्र गेल्या दहा वर्षापासुन भाजपचे सरकार असुन चंद्रपूरचे नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे गेले दहा वर्षापासुन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, वनमंत्री पद हे मोठे पद असून या पदाचा सर्वात मोठा फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू कारागिरांना व्हायला पाहिजे होता, चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील बूरुड कारागिरांसाठी नवनवीन योजनांचा पाऊस पाडून दारिद्र्याचे जिवन जगण्या पासून वंचित करायला पाहिजे होते मात्र चंद्रपूरचे रहिवासी असलेले  विद्यमान वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी बुरुड समाजातील गोरगरीब कारागिरांकडे पाठ फिरवल्यामुळे रोजगार बुडाला असून बूरूड कारागिरांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
वनातील बांबू तोडणे कायदयाने गुन्हा असला तरी आपल्या कुटुंबाच्या पोटा खातीर नाईलाजाने बूरूड कारागिरांना वनातील  बांबू तोडून आनावे लागत असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करावे लागत आहे,शासनाच्या निर्णयाची अमलबजावणी करणे हे लोकप्रतिनिधी चे काम असून या बांबू  समस्ये कडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे बूरूड कारागिरांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत असुन बांबूचा व्यवसाय नामशेष  होण्याच्या मार्गावर आहे, याआधीच्या सरकारच्या काळात बूरूड कारागिरांच्या मागणी नुसार नियमित पणे बांबू पुरवठा वहायचा परंतु भाजप च्या काळात मागणी करुनही बूरूड कारागिरांना बांबू पूरवठा होत नसल्याचे मत  चंद्रपूर जिल्ह्या बूरुड समाजाचे सहसचिव तथा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी व्यक्त  केले आहे

COMMENTS