विदर्भाचा वीर न्यूज चौफेर (गडचांदूर) – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोतालील गांवातील विकासाकरीता नेहमी प्रयत्नशील असते .
त्याचाच एक भाग म्हणून, सभोवतातलील गांवातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व शाळेतील पटसंख्या वाढावी याकरिता अल्ट्राटेक, माणिकगढ च्या सी. एस. आर. ने मानोली, बैलमपूर, जामणी ,नोकारी ,गोवारीगुडा, बॉम्बेझरी , लिंगनडोह, आसापूर , पेदासापुर आणि गढपांढरवनि अशा एकूण १० गांवातील १० जिल्हा परिषद शाळा व गडचांदूर येथील आदर्श हिंदी विद्यालय या ठिकाणी एकूण ३८१२ नोटबुक ७१४ विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेत.
यामध्ये सिंगल लाईन ,फोर लाईन,स्क्वेयर आणि रजिस्टर यांचा समावेश असून विध्यार्थ्यांच्या वर्गानुसार व शाळेच्या पटसंख्येनुसार नोटबुक चे वाटप करण्यात आलेत।
यावेळी शाळेतील विध्यार्थी ,शिक्षक ,पालक यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे गरीब विध्यार्थी सुद्धा चांगला शिखेल आणि प्रगती करेल असे प्रतिपादन शिक्षक वर्गणी करीत माणिकगढचे मनापासून आभार व्यक्त केलेत
COMMENTS